दिवाळीत फटाके फोडणे टाळा
कोरोनाला हरवण्यासाठी फटाके फोडू नका-आरोग्यमंत्री, टोपे
मुंबई, दादासाहेब येंधे : दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव व्हावा, आवाजाचा उत्सव नाही असे महाराष्ट्र सरकारने सांगितले. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण वाढू नये म्हणून फटाके फोडणे टाळावेत त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
दिवाळी पहाट सारखे कार्यक्रमही आयोजित करू नये, करायचे असल्यास ऑनलाईन किंवा सोशल मीडिया माध्यमातून आयोजित करावे. अशा सूचना नागरिकांसाठी देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांनी घराबाहेर पडणे टाळावे अशा गाईडलाइन्स सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.



0 टिप्पण्या