मुंबई, दादासाहेब येंधे : अंधेरी पोलिस ठाणे गु.र. क्र.८८६/२० कलम ३९२ भा.द. वि.मध्ये अंधेरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो. उप. निरीक्षक पगार व पथक यांनी वरील नमूद गुन्हा नोंद झाल्या नंतर तांत्रिक बाबी चे सहायाने तसेच कौशल्यपूर्ण तपास करून ३६ तासाचे आत वरील नमूद गुन्हा तसेच खालील गून्हे उघडकीस आणले.
शोएब अब्दुल मतीन शेख (२३ वर्ष) हा ड्रायव्हिंग करणारा आरोपी राहणार जे सेक्टर, s- २९, रूम न.९१,चीता कॅम्प,ट्रॉम्बे, मुंबई या आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल क्र. MH-०३-DJ-४४३६ यामह MT-१५ ही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच आरोपीने सदर दिवशी विलेपार्ले, सहार या ठिकाणी ही चैन स्नाचींग केली असल्याचे चौकशी मध्ये सांगितले आहे. तसेच त्याचा अभिलेख तपासला असता तो खालीलप्रमाणे अढळून आला आहे.
१) गु र क्र-२०२/१२ क ३९२, ४११,३४. भा द वी. गोवंडी पो.ठाणे
२)गु.र. क्र.१४३/१२ क ३७९,३४ गोवंडी पो. ठाणे
३) गु. र क्र.३७/१९ क १५(२). (९)१७७ चेंबूर पो.ठाणे
४)२१८/११ क ३२६,३२४,५०४,३४ भा.द.वी.
५)२०४/१५ क ३९२,४११,३४ ट्रॉम्बे पो ठाणे
६)२७७/१९ क ३९२,३४ भा द वी. वाशी पो ठाणे
७)--/१४ क ३९२,३४ भा द वी ट्रॉम्बे पो ठाणे
८)२०७/१२क ३९२, ३४ भा द वी
९).-/१४ क ३९२,३४ भा.द. वी. जोगेश्वरी पो ठाणे
१०)-/१९ क ३९२,३४, भा द वी सी बी डी बेलापूर
११)-/२० क ३९२,३४ भा. द. वी. वडाळा पो ठाणे.
सदर गुन्हा उघडकीस आनण्यासाठी मा. पोलीस उप आयुक्त सो परी १०, मा सहायक पोलिस आयुक्त अंधेरी विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंधेरी पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक देशमुख (गुन्हे) अंधेरी पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पो उप निरीक्षक पगार, पो.हवा.लाड, पो. ना. लहारे, पो. ना. जाधव, पो. शि. चव्हाण, पो. शि.सोनजे, पो. शि. गोपिरेडडी, पो.शि.कापसे, यांनी केले आहे. अशी माहिती अंधेरी पोलीस ठाणे मुंबई चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय बेळगे यांनी कळविले आहे.

0 टिप्पण्या