Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल चोराला अटक

 पायधुनी पोलिसांनी केली मोबाईल चोराला अटक 

मुंबई, दादासाहेब येंधे :  दि ०५/११/२० रोजी १०.३० वा. बस स्टॉप नं ४, पटेल हॉटेलच्या समोर, मो. अली रोड, पायधुनी, मुंबई याठिकाणी वर नमूद आरोपिताने फिर्यादी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातून मोबाईल चोरी केला म्हणून गुन्हा नोंद केली असून आरोपी आरीफ शब्बीर शेख उर्फ जुबेर, वय - २३ वर्षे, यास  राहणार झोपडा नं ३, निरंकारी नगर, शिवाजी नगर, बस डेपो जवळ, गोवंडी, मुंबई येथून दि ०६/११/२०२० रोजी अटक करण्यात आली.  याधीही आरोपीने लोकल ट्रेन किंवा बसमध्ये प्रवाशी चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे पैसे, पाकीट किंवा मोबाईल चोरी केले असल्याचे कबूल केले आहे. 

त्याच्याकडून रुपये ९,५००/- किमतीचा mi कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. घटनास्थळी पायधुनी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस शिपाई महाजन यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात घेऊन आले. सदर इसमाची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक मोबाईल फोन मिळून आला. सदर मोबाईल फिर्यादी यांनी ओळखून तो त्यांच्यात असल्याचे सांगितले यावरून सदर संशयीत इसमाने फिर्यादी यांचा मोबाईल फोन बसमध्ये चढत असताना चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून विहित वेळेत मा. अति. मुख्य महानगर दंडाधिकारी, २ रे न्यायालय, माझगाव (शिवडी), मुंबई यांच्या न्यायालयात हजर केले. 

सदर गुन्हेगारावरील गुन्हेगारी अभिलेख
१) GRP ठाणे, गु र क्र ४४२/२०१५, कलम ३७९ IPC
२) GRP ठाणे, गु र क्र ३०/२०१५, कलम ३७९,३४ IPC
३) GRP ठाणे, गु र क्र २३६/२०१५, कलम ३९२,४४ IPC
४) दादर रेल्वे, गु र क्र ११६/२०१७, कलम ३७९ IPC
५) मुंब्रा पो स्टे, गु र क्र २४९/२०१५, कलम १२२ मपोका
६) कुर्ला रेल्वे, गु र क्र ५५/२०१३, कलम ३७९ IPC
७) CSTM ठाणे, गु र क्र १३४/२०१७, कलम ३७९ IPC
८) कुर्ला रेल्वे, गु र क्र ३६/२०१३, कलम ३७९ IPC
९) मुंब्रा पो स्टे, गु र क्र   /२०१७, कलम १४२ मपोका
१०) GRP ठाणे, गु र क्र ५५२/२०, कलम १५०(E) रेल्वे ऍक्ट

याकामी परि. पोउपनि एकनाथ पाटील तसेच तपास पथक सपोनि निलेश बनकर, पो ह पेडणेकर, पोशि मेटकर, पोशि मोरे, पोशि महाजन यांनी कामगिरी बजावली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगांवकर यांनी दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या