Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटी रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांची 'व्हिजिबल पोलिसिंग'

 २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्ववभूमीवर रेल्वे पोलिसांची 'व्हिजिबल पोलिसिंग'

मुंबई, दादासाहेब येंधे : २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्ववभूमीवर सिएसटीएम रेल्वे स्थानकात सहाय्य्क पोलीस आयुक्त राजेंद्र पाटील व लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन स्थानकातील फलाट क्र. एक ते सात आणि लोकल लाईन जनरल हॉल येथे 'व्हिजिबल पोलिसिंग' करण्यात आली. 

दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क लावा,  अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा अशा उद्घोषणा मेगा फोनद्वारे करून प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक अशोक माने तसेच सुरक्षा बल सीएसएमटी ठाणेचे उप निरीक्षक उपेंद्र डोंगरे आदिंचा समावेश होता. 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या