Ticker

6/recent/ticker-posts

मुंब्रा पोलीसांकडुन देशी बनावटीचे एका गावठी कट्टासह आरोपीतास अटक

मुंब्रा पोलीसांकडुन देशी बनावटीचे एका गावठी कट्टासह आरोपीतास अटक

दादासाहेब येंधे :

दि.२६/११/२०२० रोजी मुंब्रा पोलीस ठाणे हद्‌दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग गरत करीत असतांना पोशि/उदय किरपण यास गुप्त बातमी मिळाली की, गिता सदन अपा.आयकान हॉस्पीटलजवळ,सम्राटनगर, मुंब्रा या ठिकाणी एक इसम आपले ताब्यात गावठी कट्टा बाळगुन दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने आला असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने त्यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री.मधुकर कड यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक/संगम पाटील,पोशि/उदय किरपण,पोहवा/सुभाष शेलार, पोना/विनोद चौधरी,पोशि/मंगेश ताजणे,पोशि/ ३०१४ मयुर लोखंडे यांचे पथक सदर बातमीचे अनुषंगाने सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी खात्रीशिर मिळाल्या माहिती प्रमाणे एक इसम संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता. विचारता त्याचे नाव इसम नामे नाजीश अन्वर सिध्दीकी,वय २४ वर्ष,रा.गिता सदन अपा. आयकान हॉस्पीटलजवळ,सम्राटनगर, मुंब्रा असे असुन त्याची अंगझडती घेता त्याचे कमरेचे डाव्या बाजुस पॅन्टचे आत खोचलेले एक देशी बनावटीचे १०,०००/-रू.किंमतीचे गावठी अग्निशस्त्र मिळुन आल्याने सदर इसमाविरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क.॥ ९४४/२०२० भारतीय हत्यार कायदा ३,२५ सह महाराष्ट पोलीस कायदा ३७ (१)१३५ अंतर्गत दिनांक २६/११/२०२० रोजी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

सदर कारवाई मा.श्री.विवेक फणसळकर,पोलीस आयुक्‍त,ठाणे शहर,मा.श्री.सुरेश मेकला, पोलीस सह आयुकक्‍त,मा.श्री.अनिल कुंभारे,अपर पोलीस आयुकत,मा.श्री.अविनाश अंबुरे,पोलीस उप आयुकक्‍त,परिमंडळ-१ ठाणे,मा.श्री.सुनिल घोसाळकर,सहाय्यक पोलीस आयुक्‍त,कळवा विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मधुकर कड, पोनिरी/रामचंद्र वळतकर (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोउपनिरी/संगम पाटील हे करीत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या