मुंबई, दादासाहेब येंधे : कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ही अधिक सजगतेने व अधिक सजगतेने व अधिक सतर्कतेने साजरी करण्यासह अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या मुख्यल्याच्या मुख्य प्रवेशद्वारालगत नवरंगांची उधळण करणारे 'पॅलेट' साकारले आहे. विशेष म्हणजे या पॅलेटमध्ये असणारे ८ रंग हे केवळ फुलांनी साकारले असून या पॅलेटच्या मध्यभागी कोविड प्रतिबंधात अत्यंत म्हत्वाची भूमिका बजावणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेचे बोधचिन्ह देखील आहे. अशी माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

0 टिप्पण्या