कोरोना योद्धयांना प्रमाणपत्र देऊन सत्कार
मुंबई, दादासाहेब येंधे : दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर कोरोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही.
या काळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद असली तरी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्ड बॉयच्या रूपाने 'देव' पांढऱ्या कपड्यांत भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होते, मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन आता सगळ्यांना करावेच लागेल. अशाच आज देवमाणसांची भेट जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या माध्यमातून झाली. यात के.ई.एम. रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. हेमंत देशमुख , आणि सहकारी, शिवडी येथील टी. बी रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. ललित आनंदे , जे जे रुग्णालयातील संत गाडगे बाबा महाराज ट्रस्ट चे व्यवस्थापक आणि समाजसेवक श्री एकनाथ ठाकूर , अमोल ठाकूर , भायखळ। विभागातील समाजसेक श्री स्वप्नील बोभाटे , या सर्वानी कोरोना च्या काळात समाज।साठी केलेल्या कार्याला तोड नाही, त्याचा च एक भाग म्हणून या सर्व कोविडयोध्याना आज जीवन प्रबोधिनी ट्रस्ट च्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले , तदप्रसंगी ट्रस्टचे सर्वेसर्वा संस्थापक श्री सत्यवान नर, अध्यक्ष श्री अमित पवार, सरचिटणीस श्री हेमंत मकवाना खजिनदार श्री श्रेयस घाटकर , कार्यकारिणी सदस्य श्री रवींद्र जाधव , विनोद कुंवर, आदी मान्यवर उपस्थित होते.





0 टिप्पण्या