Ticker

6/recent/ticker-posts

दा.भ मार्ग पोलीस ठाणेकडून सायबर गुन्हयाचे , आरोपी २४ तासात अटक


०२ नोव्हेंबर रोजी तक्रारदार नामे कैवल्य मोधा, 30 वर्षे, राठि-ऑपेरा हाऊस यांना त्यांच्या मोबाईलवर आरोपीत इसमाने मो क्र 6296524013 यावरुन संपर्क करुन तो बँक ऑफ बरोडा मधुन बोलत असल्याचे भासवुन त्यांने तक्रारदारांच्या मोबाईलवर आलोला OTP त्यांच्याकडुन प्राप्त करुन त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या त्यांच्या बँक खात्यातुन ३८,९९६/- रुपये त्यांची पत्नी नामे मितल मोधा यांच्या बँक खात्यातुन २५,००१/- रुपये असे एकुण ६३,९९७/-,रुपयांची ऑनलाईन ट्रान्सॅक्शनद्वारे फसवणुक केली . 

नमुद आरोपीताने वापरलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन जिल्हा बांका, राज्य बिहार येथील असल्याचे निष्पन्न झाले. सदर माहिती वरुन डॉ दा भ मार्ग पोलीस ठाणेचे वपोनि बांगर सो यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळीय सायबर पथकाचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक राजा बिडकर यांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवुन झारखंड येथे तपासकामी उपस्थित असलेल्या पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील व पोशि सुरज धायगुडे यांना , मा वरिष्ठांच्या परवानगीने लागलीच जिल्हा-बांका, राज्य बिहार येथे जाण्याच्या सुचना दिल्या.


मुंबई येथे डॉ.  दा.  भ. मार्ग पोलीस ठाणेस कार्यरत पोलीस उप निरीक्षक राकेश शिंदे व परिमंडळ-२ कार्यालयास कर्तव्यास असणारे पोशि मुन्ना सिंग यांनी लागलीच आरोपीतांनी वापरलेल्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यास सुरवात केली व सदर माहिती झारखंड येथील पथकास सतत देण्यास सुरवात केली. 


नमुद माहितीच्या आधारे झारखंड येथील पथक ग्रामीण वेषभुषा करुन कॉलींग लोकेशनजवळ पोहचले. सदर ठिकाणाची शहानिशाकरुन बाराहाट पोलीस ठाणे, बांका, बिहार या स्थानिक पोलीस ठाणेची मदत घेवुन आरोपीतांच्या कॉलींग लोकेशनवर छापा टाकला. नमुद लोकेशनवर उपस्थीत आरोपीत पोलीसांना पाहुन पळुन जावु लागले तेव्हा पोलीस उप निरीक्षक प्रदीप पाटील व पोशि सुरज धायगुडे यांनी १५ फुट उंचीच्या भिंतीवरुन उड्या मारुन पळणाऱ्या आरोपीतांचा पाठलाग करुन एका आरोपीस ताब्यात घेतले तर दुसरा आरोपी जंगलात पळुन जाण्यात यशस्वी झाला. 
अटक आरोपीताचे नाव व पत्ता- गुणीलाल विंदेश्वरी मंडल, २१ वर्षे, राठि- गाव पनिया, पोलीस ठाणे- बाराहाट, जिल्हा-बांका, राज्य-बिहार ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोनसह एकुण १३ मोबाईल फोन, १३  सिमकार्ड हस्तगत करण्यात आले. तसेच कॉलींग साईटवरुन आरोपीतांच्या २ मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपीताच्या घर झडती मध्ये इतर मोबाईल फोनचे बॉक्स १,२०,०००/- रुपये रोख रक्कम, फसवणुक करुन कमवलेल्या रक्कमेतुन खरेदी केलेली एक वॉशिंग मशीन व एक LED टिव्ही असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. 


वर नमुद गुन्ह्याचा तपास अतिशय सुयोग्य नियोजन करुन संघटीत रित्या केलेला असुन सदर गुन्ह्याची गंभिरता व संवेदनशिलता ओळखुन सदरचा गुन्हा तांत्रिक कौशल्याचा वापर करुन व अथक परिश्रम घेवुन श्री सुर्यकांत बांगर, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.दा.भ.मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि प्रदीप पाटील, पोउनि राकेश शिंदे, पोशि सुरज धायगुडे, पोशि अरुण भोसले, पोना मुन्ना सिंग (परिमंडळ-२ कार्यालय) यांनी करुन नमुद गुन्हा २४ तासात उघडकीस आणला आहे. 

गुन्ह्यात वापरण्यात आलेले IMEI क्रमांक
884303047180328 355202/10/3333 884303047180328 357727106148601
357727106148601 357727106148609 353569/09/069030/3 353570/09/069030/1
357727106148609 353700/11/286446/5 353751/11/286446/8 354567095989919
355201/10/33332 911561700428814 911561700508814 350561/94/038762/1
356169/39/038762/2 352559/11/572369/5 352560/11/562369/3 869250042972076
869250042972068 911601750311949 911601750311956 863296045568458
863296045568441 867212054646396 867212054646388 864684045490055
864684045490048
गुन्ह्यात वापरण्यात आलेले Mobile क्रमांक
7797647372 7739170037 6296524013 8371868326
8384050428 7857820755 9304140251 9769889261
7543942024 7384713975 7482870832 7082551590
8521256747


गुन्ह्यात वापरण्यात आलेले IMSI क्रमांक
8991526200005293729U 8991000903271549567U 8991526200005293729U 40552120810010
8991000903271549567U 899167192288320 899167192387310 405521208180014
8991526200 47885752U 8991702011146605563
आरोपीतांकडे मिळुन आलेले PAYTM पेमेंट बँक ATM कार्ड
Bank Name  Account numbers Debit Card Numbers
PAYTM  BANK  6080 3205 8235 2490
 6080 3205 8235 2334
BANK OF INDIA 586118210028365
ACCOUNT HOLDER NAME :  
YASHODA DEVI
BANK OF INDIA 5264 9536 8553 329
CANRA BANK 5089 2557 3801 8111
वर नमुद मोबाइल, दक्षीण प्रादेशिक विभागतील इतर पोलीस ठाण्यातील गुन्हयात वापरले असतील तर , तसेच अशी पध्दत वापरून , बॅंक बडोदाचे नाव वापरून , किंवा त्या ठिकाणाचे लोकेशन असेल तर त्वरीत आमच्याशी संपर्क साधावा व सदर आरोपीचा ताबा घ्यावा. अशी माहिती डॉ.दा.भ.मार्ग पोलीस ठाणेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर यांनी दिली आहे. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या