Ticker

6/recent/ticker-posts

गुन्हे शाखा कक्ष-९ ची दमदार कारवाई

बनावट कागदापत्रांच्या आधारे विविध वित्तीय संस्थांचे कर्ज मिळवुन घेतलेल्या बाईकवर बनावट नंबर प्लेट लावुन लोकांना विकुन फसवणुक करणारी टोळी गुन्हे शाखेकडुन जेरबंद...

मुंबई, दादासाहेब येंधे : कक्ष-९, गु.प्र.शा., गु.अ.वि., मुंबई चे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना त्यांच्या गुप्तबातमीदाराने माहिती दिली की, काही लोक ठराविक शोरुममध्ये बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे सादर करुन, सदर बनावट कागदापत्रांवर विविध वित्तीय संस्थांचे कर्ज घेवुन त्याव्दारे बाईक घेतात व त्या बाईक कमी किंमतीत इतर लोकांना विकतात व त्याबाबत कोणतीही कागदपत्रे नमुद इसमांना देत नाहीत, अशा प्रकारे त्यांनी सुमारे ५०० मोटर सायकल्स खोटया कागदपत्रांच्या आधारे प्राप्त केल्या आहेत. सदर मिळालेल्या खात्रीलायक माहितीची कक्षामार्फत गोपनीयरित्या शहानिशा करण्यात आली.
सदर बातमीच्या अनुषंगाने दिनांक ११/०९/२०२० रोजी एक इसम बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रांच्या आधारे बँकांकडुन कर्जाने विकत घेतलेली सुझुकी अँसेस बाईक क्रमांक.'एमएच-०१-सीवाय-१६७९ ही कमी किंमतीमध्ये विकण्याकरीता माहिम पश्चिम, मुंबई या ठिकाणी येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन सदर ठिकाणी सापळा रचुन एका इसमास नमुद मोटर सायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या साथीदारासह संगनमत करुन बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रे तयार करुन त्यांच्या आधारे बॅकांकडुन खोटया कागदपत्रांच्या आधारे कर्ज मिळवुन अंदाजे रु. ३५ लाख किंमतीची अंदाजे ५० मोटर सायकल्स “युनायटेड मोटर्स, माहिम', “अगरवाल मोटर्स, सातरस्ता" व 'रत्ना मोटर्स, डी.बी.मार्ग, ग्रँड रोड' या शोरुममधुन विकत घेतल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत गु.प्र.शा., गु.र.कं. १३३/२० (माहिम पोलीस ठाणे गु.र.क्र. २७१/२०), कलम ४२०,४६५,४६७,४६८, ४७१, ३४ भा.द.वि. दाखल करण्यात आला असुन केलेल्या तपासात आणखी 'एका आरोपीस अटक करुन दोन्ही आरोपीतांकडुन अदयापपर्यंत एकुण १३ सुझुकी अँसेस, बर्गमॅन मॉडिलच्या बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत व इतर मोटर सायकली हस्तगत करण्याची प्रकीया चालु आहे.सदर कामात त्याना मदत करणारे शोरुममधील इसम, बॅकाचे कर्ज प्रतिनिधी व इतर साथीदार यांच्याकडेही अधिक तपास चालु आहे.

अशाप्रकारे क्राईम ब्रँच युनिट-९ च्या पथकाने बनावट कागदापत्रांच्या आधारे विविध वित्तीय संस्थांचे कर्ज मिळवुन घेतलेल्या मोटर सायकली लोकांना विकुन फसवणुक करणा-या टोळीला जेरबंद केले आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. मिलिंद भारांबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.एस. विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१), श्री.अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-पश्चिम, श्री.अविनाश शिंगटे (अतिरिक्त कार्यभार), प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. संजीव गावडे, पो.नि. आशा कोरके, स.पो.नि. सुधीर जाधव, स.पो.नि. शरद धराडे, पो.उ.नि. विजयेंद्र आंबवडे, पो.ह.काकडे, पो.ह देवरूखकर, पो.ह. सावंत, पो.ह. पाटील, पो.ह. शेख, पो.ह. कोळी, पो.ना. राऊत, पो.शि. महांगडे, पो.शि. गवते, म.पो.शि. लाड व पो.ह.चा. निकम यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या