Ticker

6/recent/ticker-posts

अजगराने अडवली वाट

एक तासांच्या प्रयत्नांनंतर या अजगराची सुखरूप सुटका

मुंबईदादासाहेब येंधे : सायनचेंबुर मार्गावरील एव्हरार्ड नगर येथे सोमवारी एका दहा फुटी अजगराने वाहनचालकांची वाट अडवली होती.

सकाळी नेहमीप्रमाणे या मार्गावर वाहनांची वर्दळ सुरू असताना नागरिकांना अचानक एक भलामोठा अजगर रस्ता ओलांडताना दिसलावाहनचालकांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी आपापली वाहने थांबवत अजगराला वाट मोकळी करून दिली.

पणहा अजगर रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीच्या मागच्या चाकातून आतमध्ये शिरलापोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी जाऊन सर्पमित्रांना पाचारण केलेयानंतर सुनील कदमसिद्धार्थ गायकवाड तसेच अभिरुप कदम या सर्पमित्रांनी तब्बल एक तासांच्या प्रयत्नांनंतर या अजगराची सुखरूप सुटका केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या