Ticker

6/recent/ticker-posts

सायन रुग्णालयाबाहेर भाजपचे ठिय्या आंदोलन

आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसासनाला विचारला जाब
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई महापालिकेच्या सायन रुग्णालयात अपघातात जखमी होऊन मृत्युमुखी पडलेल्या अंकुश सुरवडे या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह प्रशासनाने कोरोना रुग्णाच्या कुटुंबाकडे सोपवला आणि त्याचे अंतिम विधी पार पडले.
या भयंकर प्रकाराविरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायन रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. अंकुशच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दरेकर यांनी देताच या प्रकरणावर बुधवारी बैठक घेण्याचे आश्वासन महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले.
सायन रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे अंकुशला जीव गमवावा लागला. रुग्णालयाच्या बेजबाबदार कारभाराविरुद्ध प्रशासनाला जाब विचारण्यासाठी झालेल्या या आंदोलनात प्रवीण दरेकर यांच्या समवेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार सेल्वन, आमदार कालिदास कोळंबकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर आदी सहभागी झाले होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या