जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत काळजी घ्या
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये आपल्याला काही बदल करणे आवश्यक झाले असून मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण याचा वापर याच्याही पलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे गरजेचे झालेले आहे.
जोपर्यंत कोविड विषाणूवर प्रभावी लस सापडत नाही तोपर्यंत नागरिकांनी या सर्व बाबींचे पालन करून या साथ रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे, असे म्हणत मुंबईकरांनो खरेदीसाठी जात आहात. पण, स्वतःची काळजी घ्या असेही आव्हान मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
बाजारात जाताना; हे कराच...
- बाजारात खरेदीकरिता जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे तसेच कमी गर्दीच्या वेळी जावे.
- दुकानात बाहेर तसेच आत मध्येही इतरांपासून सुरक्षित अंतर राखूनच वावर होईल याची काळजी घ्यावी.
- गर्दी असल्यास तिथे प्रवेश करू नये. जिन्याचा वापर करावा, कठड्यांना स्पर्श करू नये.
- खरेदीसाठी प्रधान यांनी ऑनलाईन पद्धतीचाच वापर करावा.
- दुकाने मंड्या संकुल येथे सुरक्षित अंतर याच्या खुणा करून मर्यादित ग्राहकांनाच एकापाठोपाठ प्रवेश द्यावा.
0 टिप्पण्या