मुंबईतील दुकाने उद्यापासून सुरू
मुंबई दादासाहेब येंधे : मुंबईमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्यामुळे 'मिशन बिगिन -३' अंतर्गत उद्या बुधवारपासून मुंबई पुन्हा सुरू होत आहे.
उद्यापासून सर्व दुकाने आठवड्यातील सर्व दिवशी सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने उघडण्याचा सम-विषम पद्धतीचा नियमही यानिमित्ताने रद्द करण्यात आला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी याबाबतचे परिपत्रक काढून कळविले आहे.
- टॅक्सी तसेच चार चाकी वाहन ड्रायव्हरसह फक्त तीन जणांना परवानगी.
- रिक्षामध्ये ड्रायव्हर व दोन प्रवासी प्रवास करु शकतील.
- बाईकवर हेलमेट्सह दोघांना परवानगी देण्यात आली आहे.
तर मॉलमधील चित्रपटगृहे, हॉटेल आणि खाद्यपदार्थ पुरवणारी दुकाने बंदच राहणार आहेत. स्विमिंग पूल, शाळा-कॉलेजेस तूर्तास बंदच राहणार आहेत. मुंबईत मद्य विक्रीच्या दुकानात काउंटरवर दारू विकण्यास आणि घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देताना मास्क, सुरक्षित वावर यांचे नियम कठोर करण्यात आले आहेत. कुठल्याही दुकानासमोर गर्दी होणार नाही याची खबरदारी प्रत्येक दुकानदाराने तसेच नागरिकाने घ्यायची आहे.
नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदार तसेच ग्राहकांवर साथरोग नियंत्रण कायदा आणि फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदार तसेच ग्राहकांवर साथरोग नियंत्रण कायदा आणि फौजदारी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.





0 टिप्पण्या