Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई जलमय

मुंबईत पाऊस, रेल्वे ठप्प, बससेवा मंदावली...

अत्यावश्यक सेवेसाठी सुरू असलेल्या रेल्वे लोकल सेवेवरही परिणाम

मुंबई : मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा फटका लोकलसेवा व बेस्ट बस सेवेलाही बसला आहे. पश्चिम रेल्वे पूर्ण ठप्प झाली आहे. तर हार्बर लाईनवरील कुर्ला आणि सिएसएमटी दरम्यानची रेल्वे सेवा बंद आहे.

मुंबईतील माटुंगा आणि शीव पोलीस ठाणेत देखील पाणी शिरले आहे. काही पोलीस बांधव भरपावसात उभे राहून नागरिकांना सावधानतेच्या सूचना देत आहेत.


पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील कांदिवली, किंग्ज सर्कल, हिंदमाता, परेल, प्रभादेवी, घाटकोपर, शिवडी, कुर्ला, माटुंगा, वडाळा या सखल भागात पाणी साचले आहे. काही भागात गुडघाभर पाणी साचले आहे.






बोरिवली नॅशनल पार्क व्हिडिओ


बोरिवली येथील दृश्य व्हिडिओ





*सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या