Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस

मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस


मुंबई, दादासाहेब येंधे : बुधवारी दुपारी १  वाजेनंतर मुंबईत वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. हा पाऊस बघून मुंबईकरांना धडकीच भरली होती. मुसळधार सरी, सोसाट्याचा वारा आणि समुद्राला आलेली भरती अशा तिहेरी संकटात मुंबईकर सापडला होता. नदीला आलेला पूर पाहून मुंबईकरांच्या मनातील २६ जुलैच्या भीतीदायक आठवणी यानिमित्ताने पुन्हा ताज्या झाल्या.

कधी नव्हे ते दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते. ग्रँड रोड, मुंबई सेंट्रल, क्रॉफर्ड मार्केट, सात रस्ता, लालबाग, परळ, हिंदमाता, दादर, माहीम, चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, चुनाभट्टी, मानखुर्द आदी परिसर जलमय झाला होता. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले होते. दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरले होते. जलमय झालेल्या रस्त्यांवरील उभ्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.

कित्येक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. तर काही बिल्डिंगवरील छत उडून वरून खाली कोसळली.
चर्चगेट, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह यासह विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. दुपारी समुद्राला आलेली भरती, सोसाट्याचा वारा यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी, अवघी मुंबई जलमय झाली.

















व्हायरल व्हिडिओ



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या