Ticker

6/recent/ticker-posts

अयोध्येत राम मंदिराचा पाया रचला

अखेर राम मंदिर साकार झाले

मुंबई, दादासाहेब येंधे : अखेर तो दिवस उजडला... कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली.... कोट्यवधी भारतीयांच्या धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक भावविश्वाचा घटक असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे अयोध्येतील त्यांच्या जन्मभूमीच्या जागेवर भव्य मंदिर उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा बुधवारी भक्तिरसपूर्ण वातावरणात साजरा झाला. 

या सोहळ्यासाठी संपूर्ण आयोध्या श्रीराममय झाली होती. देशभरात आणि परदेशांतही अनेक ठिकाणी भूमिपूजनाचा आनंद साजरा  करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

वेद मंत्रोच्चाराच्या जयघोषात भूमिपूजन विधी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. पायाभरणीचा शुभमुहूर्त १२.४४ वाजता होता. ठीक १२.४४ वाजता भूमिपूजन झाले. पंतप्रधानांच्या हस्ते चांदीची वीट अर्पण करून भूमिपूजन करण्यात आले. पायाभरणी सोहळ्याचे पौरोहित्य दुर्गा गौतम यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास आणि संत-महंत तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. हा बहुप्रतिक्षित समारंभ लाखो देशवासियांनी दुरचित्रवाणीवरून अनुभवला.

मुंबईत नागरिकांनी घरोघरी रांगोळ्या काढल्या, दिवे लावले तर काहीजणांनी गुढ्या उभारन राम मंदिराचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद व्यक्त केला.





रांगोळी काढताना




असे साकारणार मंदिर




*सोशल मीडियावर व्हायरल फोटो


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या