रामभक्तांची प्रतीक्षा संपली;
आज श्रीराम मंदिराचे भूमिपूजन
मुंबई, दादासाहेब येंधे, दि.५ : अनेक दशकांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनासाठी देशभरातील साधू संत महंत आणि धर्मचाऱ्यांचे अयोध्येत आगमन होत असून या धर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या 'जय श्रीराम' च्या घोषाने रामनगरी अयोध्या दुमदुमून गेली आहे. मंदिराच्या भूमिपूजनाची प्रतीक्षा अखेर आज संपणार आहे. आज (दि. ५ ऑगस्ट २०२०) बुधवारी अत्यंत हर्षोल्हासात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन होणार आहे.
तत्पूर्वी अयोध्येत ठीकठिकाणी रांगोळ्या, विविध रंगांमध्ये भिंती सजविण्यात आल्या आहेत. फुलांच्या माळा लावण्यात येत असल्याचे चित्र नजरेस पडत आहेत. प्रसाद म्हणून लाडू बनविण्याचे कामही मोठया आनंदात सुरू आहे. एकंदरीतच आज अयोध्येत जणू दिवाळी साजरी होणार आहे की काय असे चित्र आहे.
*सोशल मीडियावर व्हायरल झालेले काही फोटो



0 टिप्पण्या