Ticker

6/recent/ticker-posts

१२ वर्षानंतर घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

मुंबई, दादासाहेब येंधे : पायधूनी पोलीस ठाणे गु.र.क्र. २००/२०१४ कलम ४५४, ३८०, ३४२, ४११, ३४, भादवि (कोर्ट केस क्रमांक ६८६/PW/२०१४) या गुन्ह्यातील आरोपी ख्वाजा सलीम शेख, वय,३६ वर्षे)हा मागील १२ वर्षांपासून फरार होता.

आरोपी हा दाट झोपडपट्टी परिसरात वास्तव्य करत असल्याने व आरोपीच्या नावाव्यतिरिक्त कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने आरोपी मिळून येत नव्हता.

पायधुनी पोलीस ठाण्याचे पथकाने  गोपनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीवर अधिक सखोल तपास करून आरोपीचा माग काढून  त्याच्या पायलीपाडा, ट्रॉम्बे, मुंबई येथून मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. 

सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई शहर, श्री. मनोजकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त(का व सु), श्री. शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त,द. प्रा.वि., श्रीमती रागसुधा आर. पोलीस उप आयुक्त, दक्षिण परिमंडळ-२, श्रीमती रेणुका बुवा, सहाय्यक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली  श्री लक्ष्मीकांत साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पायधुनी पोलीस ठाणे,मुंबई,

पोलीस उपनिरीक्षक आर पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार इक्के, सपोउनि शेंडगे, सपोउनि राणे आणि पो.ह.क. ९६-०८२८/कानडे यांनी पार पाडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या