मुंबई, दि. १६ : रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाने देश बांधवांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची केली. भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरील उपांत्य फेरीत ही टीम इंडियाने बुधवारी न्यूझीलंडवर ७० धावांनी विजय मिळवत वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
हा विजय खऱ्या अर्थाने गोड झाला तो विराट कोहलीच्या विक्रमी ५० व्या वन डे शतकाने आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या प्रभावी कामगिरीमुळे. आता अंतिम फेरीत भारताची लढत कोणाशी होईल ते आज गुरुवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातून ठरेल.
0 टिप्पण्या