लोन ॲपच्या माध्यमातुन सायबर, सेक्सटॉर्सन, ब्लॅकमेल करणा-या इसमांना अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, १४ नोव्हेंबर, २०२३

लोन ॲपच्या माध्यमातुन सायबर, सेक्सटॉर्सन, ब्लॅकमेल करणा-या इसमांना अटक

ठाणे रेल्वे पोलीस ठाणेची उत्कृष्ट कामगिरी


ठाणे, दि. १४ : दि.०८ जुलै २०२३ रोजी ठाणे रेल्वे पोलीस ठाणे येथे दिवा स्टेशन येथे लोकल रेल्वे ट्रेन खाली एका ३४ वर्षे मुलीला लोन ॲपच्या माध्यमातुन त्रास देवुन मॉर्फ करुन पोर्न व्हिडीओ/फोटो पाठवुन ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करीत होते व पैसे नाही दिलेतर संपर्कातील नंबर वर ते व्हिडीओ व फोटो पाठवुन बदनामी करु व त्रास देत असल्याने सदर बळीतिने लोकल ट्रेन खाली आत्महत्या केली. ठाणे रेल्वे पोलीस ठाणेस बळीत हिच्या नातेबाईकांनी तक्रार दाखल केल्याने वरिष्ठांनी वरील गुन्ह्याचा कसुनतपास करुन आरोपींना अटक केरण्याचे आदेश दिले.

नमुद गुन्ह्यात कोणताही पुरावा उपल्बध होत नसताना तांत्रिक पध्दतीने सायबर सेलची मदत घेवुन गुन्ह्यातील बळीताच्या मोबाईल व बैंक खात्यातील वेगवेगळ्या बारकाव्यांचा अभ्यास करुन अथक प्रयत्न करुन गुन्ह्यातील संशयीत आरोपी हे वेगवेगळ्या बैंक व नेटवर्कच्या माध्यमातुन काम करत असल्याने पोलीसांची दिशाभुल करीत असताना ठाणे रेल्वे पोलीस ठाणेच्या पथकाने आरोपींच्या हालचालींचा ब कृतीवर बारकाईने लक्ष ठेवुन वरिष्ठांच्या परवानगीने पंजाब ब आसाम येथे पथक पाठवुन खालील दोन इसमांना गुन्ह्यात वापरत असलेल्या विविध बैंकांचे एटीएम/डेबीट कार्डस, मोबाईल फोन हस्तगत करुन गुन्हा उघड केला.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची माहिती -

पुरुष आरोपी क्र. 1 वय 29 वर्ष, रा. मु.पो. दुबापारा, ता. मातिया, जि. गोवालपारा, राज्य आसाम, तसेच, सेक्‍्युरीटी रुम, पुडूचीरी युनिवर्सीटी, चिन्ना कालापेट, पुडूचीरी, याच्याकडे मिळुन आलेला मुद्देमाल -


अ) 00 /-रू. किमतीचे एचडीएफसी बैंक, आयडीएफसी बैंक, कोटक बैंक, आयडीबीआय बैंक, कॅथलीक सिरीयन बैंक, एस बैंक, पेटीएम पेमेंट बैंक चे एटिएम कार्ड.


ब) 29,990 /-रू. किमतीचा ओप्पो एफ-19 प्रो कंपनीचा ग्रे सिल्वर रंगाचा मोबाईल फोन जु.वा.क) 00 /-रू. किमतीचे मोबाईल सिमकार्डचे वेलकम पॅक रिकामी असलेले पॅकेट.


2) पुरुष आरोपी क्र. 2 वय 32 वर्षे, रा. मु.पो. दुबापारा, ता. मातिया, जि. गोवालपारा, राज्य आसाम आधार कार्डचा पत्ता - हजांग हाउस नं 667, सेक्टर 56, चंदिगड, राज्य पंजाब, सध्याचा पत्ता - चौधरी गेस्ट हाउस, नयागाव, नाडारोड, मोहाली, पंजाब, याच्याकडे मिळुन आलेला मुद्देमाल -


अ) 00 /-रू. किमतीचा आयडीएफसी बैंक चे एटिएम कार्ड.


ब) 48000 /-रू. किमतीचा आय फोन 11 कंपनीचा लाल रंगाचा मोबाईल फोन जु.वा.


क) 14,990 /-रू. किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एम 30 एस कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल फोन जु.वा.


ड) 07,499 /-रू. किमतीचा एपगाश% प्र01 20 कंपनीचा रंगाचा मोबाईल फोन जु.वा. 1,00,429/-रू


अशा प्रकारे ठाणे रेल्वे पोलीस ठाणे, लोहमार्ग मुंबई च्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपासाच्या आधारावर अथक प्रयत्न करुन मोर्फ पोर्न व्हिडीओ/फोटो पाठवुन ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करणारे वरील दोन इसमांना अटक केली.


सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्‍त सो, लोहमार्ग मुंबई, मा. पोलीस उपआयुक्त सो, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुबंई, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो, कल्याण विभाग, लोहमार्ग मुंबई, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कांदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पोळ, पोलीस हवालदार 3233 अर्जुन, पोलीस शिपाई 742 पाटील, 646 राठोड, 007-2018 चव्हाण, 217-2018 देसाई, 635 रहेरे, 725 पाटील सर्ब नेमणुक ठाणे रेल्वे पोलीस ठाणे, ब पोलीस शिपाई 1325 राठोड नेमणुक सायबर सेल, लोहमार्ग मुंबई यांनी पार पाडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज