पाच जणांच्या टोळीला अटक
दि.९ जुलै २०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : देवनार पशुववधगृहांमधून बकरा विक्री करणाऱ्या व्यापाराच्या खिशातून रोकड चोरी झाल्याप्रकरणी देवनार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला पकडून जवळपास ६८ हजारांची रोकड व चोरीचे १६ मोबाईल हस्तगत केले आहेत.
गेल्या महिन्यात देवनारच्या पशुवधगृहात बकरा मंडित मोठ्या संख्येने बकरा व्यापारी त्यांचे बकरे विकण्यासाठी आले होते. २५ जून रोजी एका व्यापाराच्या खिशातून रोख रक्कम चोरीला केली होती. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि कैलास सोनवणे, उपनिरीक्षक सुजाता बुधवंत तसेच शिंदे, आंब्रे, सांगळे, विशाल पाटील, राहुल पाटील आदी पथकाने तातडीने तपास सुरू केला. खबऱ्यांच्या मदतीने तपास करत असताना या पथकाने साबीर शिराज सय्यद (वय, ३८), दस्तगीर उर्फ फिरोजसाबीर हसन शेख (वय, ३२), सलाम नईम खान (वय, ३५), अब्दुल्ला मो. आरिफ शेख (वय,२५), नासीर नईम खान (वय, ४२) या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा