सातत्याने तपासाची चक्रे फिरवून मुलास शोधून केले पालकांच्या स्वाधीन...
दि.८ जुलै २०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे गु. रजि. नं. ३५५/२०२३ कलम ३६३ भादंवि अन्वये दिनांक १९ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयातील पीडित मुलगा नामे चंदन जयनारायण विश्वकर्मा, वय १५ वर्षे, रा. ठि. कामोठे, पनवेल हा दिनांक १२ एप्रिल २०२३ रोजी त्याचे घरातून निघून गेला. हा मुलगा हा दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी सीएसएमटी रेल्वे स्टेशन येथे चाईल्ड लाईन सदस्यांना मिळून आल्यानंतर त्यांनी त्यास ताब्यात घेतले असता सदर मुलगा त्यांच्या ताब्यातून पळून गेला. सदर मुलगा हा कोठेही मिळून न आल्याने त्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केलेबाबत त्याचे वडील नामे जयनारायण विश्वकर्मा यांनी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणेत दिले तक्रारीवरून वर नमुदप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोउनि श्री नष्टे यांनी करून पिडीत बालकाचे मोबाईल क्रमांक 7400381264 या क्रमांकाचे मोबाईल ट्रेसिंग रिपोर्ट प्राप्त केले. परंतू त्यातून उपयुक्त माहिती मिळून आली नाही. सदर गुन्हयातील पिडीत बालकाने त्याचा मित्र अरशद यास इन्स्टाग्राम या सोशल मिडीयावर मेसेज केले होते. त्यानुसार पोउनि श्री संजय नष्टे, पोहवा/७२, दिलीप येळवे यांनी सदर गुन्हयाचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता सदर मुलगा हा पचेवर, मालखुरा, जि. टोंग, राज्य राजस्थान येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोउनि श्री नष्टे व पोहवा/७२ दिलीप येळवे यांना योग्य त्या सुचना देवून राज्य राजस्थान येथे तपासकामी रवाना केले. पोउनि श्री नष्टे व पोहवा/७२ येळवे यांनी राजस्थान राज्य येथे जाऊन त्या मुलाचा शोध घेतला असता तो आवडा, ता. पचेवर, मालखुरा, जि. टोंग, राज्य राजस्थान येथे मिळून आला. नमुद मुलाकडे अधिक चौकशी केली असता तो, Mr. India Hacker या युटयुब चॅनेलचे युटयुबर दिलराजसिंग रावत यांना भेटण्याचे उद्देशाने घरातून निघून गेला असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले आहे. सदर पिडीत मुलास त्याचे पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलेले आहे.
सदर गुन्हयात पोउनि श्री संजय बबन नष्टे,पोहवा/७२, दिलीप शंकर येवळे यांना गुन्हयाचे तपासात सातत्याने पाठपुरावा करून केवळ इन्स्टाग्राम या सोशियल मिडीयावर प्राप्त मेसेजच्या अनुषंगाने तपास करून नमुद गुन्हयातील पिडीत मुलाचा शोध घेवून सदरचा गंभीर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तसेच सदर गुन्हयाचे तपासात सपोफौ/रघूनाथ प्रल्हाद चव्हाण, नेम. सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे, पोना/११११ सचिन व्यंकट निंबाळकर, पोशि/अनिल राजीव राठोड, नेमणूक सायबर शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी देखील मोलाची भूमिका पार पाडली आहे. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे.
Press note
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा