मुंबई, दि. १४ : किरकोळ वादातून पुतण्याचे अपहरण करणाऱ्या काकाला अखेर जे. जे. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अपहरण झालेल्या मुलाला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.
तक्रारदार या गृहिणी असून अटक आरोपी हा त्यांचा दीर आहे. महिलेचा एक तीन वर्षांचा मुलगा आहे. ४ जूनला अटक आरोपीने मुलाचे अपहरण केले होते. मुलाच्या अपहरणाची माहिती समजतात महिलेने जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी तीन पथके तयार केली. उपनिरीक्षक सैफन कुरणे यांचे पथक पश्चिम बंगाल येथे गेले. तेथून पोलिसांनी अल्पवयीन मुलाची सुटका केली. आरोपी हा कुलबेरिया बस स्टॉप येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून अटक करून आरोपीला ताब्यात घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा