Ticker

6/recent/ticker-posts

शरद पवारांनी टाकली गुगली

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होणार... मोठ्या घडामोडी घडणार, अशा चर्चा गेले कित्येक दिवस सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी टाकलेल्या एका अनपेक्षित राजकीय गुगलीने राज्यातील राजकीय मॅच पूर्णतः फिरली. 


आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत अशी घोषणा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी एका कार्यक्रमात केली आणि राष्ट्रवादीत एकच हलकल्लोळ उडाला. संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या भेटीगाठी, बैठका पवार यांच्या मन धरणीचे सातत्याने प्रयत्न, यानंतर 'मला यावर विचार करायला दोन-तीन दिवस द्या', असे आवाहन पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते यांना केले आणि हल्लकल्लोळ काहीसा शमला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या