Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे लोहमार्ग पोलिसांतर्फे जनजागृती अभियान

मुंबई, दादासाहेब येंधे : रेल्वे स्थानकातील गुन्हेगारी कमी करण्यासह रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी महाराष्ट्र पोलीस रेझिंग दिनानिमित्त आठवडाभर प्रवासी जनजागृती कार्यक्रम मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे. त्यानुसार २ ते ८ जानेवारी या कालावधीत अभियान पार पडणार आहे.


त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काल गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 'रायझिंग डे' निमित्त अंजुमन इस्लाम स्कुल मधील विद्यार्थ्यांच्या बँडपथकाने सीएसएमटी स्थानकावर मिलन हॉल येथे संचलन करून देशभक्तीपर गीत वाजविले.

व्हिडिओ पहा...👇




यातून रेल्वे स्थानकातील वातावरण देशभक्तिमय झाले होते. त्यामध्ये एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच पोलीस उपनिरीक्षक तमीज मुल्ला यांच्यासह २५ पोलीस अंमलदार उपस्थित होते. 


त्यानंतर पोलीस ठाणे समोरील परिसरात सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांना पोलीस ठाणे मधील शस्त्रे, दारुगोळा याबाबत पोलिस अंमलदार गुलाबराव काटे यांनी माहिती दिली व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच विद्यार्थ्यांना पोलीस ठाणे मधील कामकाज कसे चालते याबाबत माहिती देखील देण्यात आली. रेल्वे प्रवाशी यांनी सदर कार्यक्रमाबाबत पोलिसांचे कौतुक केले आहे. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या