Ticker

6/recent/ticker-posts

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

वाढत्या संसर्गाची मुख्यमंत्र्यांकडून दखल


मुंबई, दि. १५ : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक  इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले. 

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावीत. संसर्ग पसरणार नाही याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाचा वेगही वाढविणे आवश्यक आहे तसेच बाधितांचे सर्वेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले.


3330

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या