मुंबई, दि. १२ : मुंबईत खाजगी हेलिकॉप्टर, हॉटएअर बलून यांसह सर्व गोष्टी वापरण्यास पुढील ३० दिवस बंदी घालण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर पर्यंत ही बंदी लागू असेल.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता असून पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. तसेच दहशतवाद्यांकडून ड्रोन आणि लहान विमानांचा वापर करून हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुंबईवर रिमोट कंट्रोल विमानाद्वारे हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये व्हीआयपींना लक्ष केले जाण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांसह देशद्रोही ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लाइडरचा वापर करून हल्ला करण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ४ नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली होती.
0 टिप्पण्या