सराईत चोराने ज्वेलर्स फोडले - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

सराईत चोराने ज्वेलर्स फोडले

अंगठीसाठी दोन हजार कमी न केल्याने सटकली


मुंबई : अंगठी खरेदी करायचे होती, पण भाव करूनही दोन हजार कमी न केल्याने त्याची सटकली. त्याने तेच डोक्यात ठेवून त्या सराफाचे दुकानच साफ केले. चोरलेले सोने वितळूनही काही सोने विकण्याचा प्रयत्न केला. पण, गुन्हे शाखा युनिट-५ च्या पथकाने दोघा चोरांना पकडून काही सोने हस्तगत केले आहे.



विनोद सिंग (वय, ५२) आणि पारस जगोलिया (वय, ५०) अशी दोघांची नावे आहेत. दादर पश्चिमेकडे आर.के. वैद्य मार्गावर असलेल्या जे. बी. पेडणेकर ज्वेलर्सच्या दुकानात २४ ऑगस्टला भर दुपारी चोरीची घटना घडली होती. चोरांनी २४९२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून आले होते. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभावी निरीक्षक घनश्याम नायर, निरीक्षक सदानंद येरेकर, एपीआय अमोल माळी तसेच न्यायनिर्गुणे, अविनाश चिलप, इकबाल सिंग, पाटील, जाधव, काळे व पथकाने तपास सुरू केला.


सतत दहा दिवस अहोरात्र खबरी व तांत्रिक बाबीने तपास करीत असताना गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विनोद सिंग हा असून तो नालासोपारा येथे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नालासोपारा गाठून विनोदला पकडले. विनोदने चोरलेले दागिने वितळवून बनवलेले काही सोन्याची बिस्किटे विकण्यासाठी पारस हा अहमदाबाद येथे गेल्याचे सांगितले. हे कळताच एका पथकाने तिथे जाऊन ते सोने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या पारसला पकडले. या दोघांकडून सोने तसेच चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. या आरोपींचा तिसरा साथीदार फार असून त्याचा शोध सुरू आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज