मुंबई, दादासाहेब येंधे : नामांकित कंपन्यांच्या दुधामध्ये अशुद्ध पाणी मिसळून मुंबईकरांच्या आरोग्याची खेळणाऱ्या सहा जणांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गुन्हे नियंत्रण पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांच्या पथकांनी धारावीतील झोपडपट्टीमध्ये छापा टाकून तब्बल १००० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला आहे. अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर पाणी अशी एक लिटर दुधाची पिशवी तयार करून ते विक्री करीत असल्याचे समोर आले आहे.
धारावीच्या शाहूनगर परिसरातील ए. के. गोपाळ नगर या झोपडपट्टी मधील अनेक घरांमध्ये नामांकित कंपन्यांचे दूध आणून त्यामध्ये भेसळ केली जात असल्याची माहिती गुन्हे नियंत्रण पथकाला मिळाली. पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सहा वेगवेगळी पथके तयार केली. या सहा पथकांनी झोपडपट्टीत छापा टाकला. छापा टाकलेल्या सर्व खोल्यांमधून गोकुळ, अमूल, तसेच इतर कंपन्यांच्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या मेणबत्त्या, प्लास्टिकची नरसाळे तसेच भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्य आणि १००० लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा हस्तगत केला.
Press Note

0 टिप्पण्या