तरुण शिवसैनिक महिला आघाडी तसेच ज्येष्ठ शिवसैनिकांनी उद्धव यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस काल बुधवारी होता. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांच्या या वाढदिवसाला विशेष महत्त्व असल्याने दरवर्षीपेक्षा यंदा मोठी गर्दी जमली होती.
मातोश्रीवर मोठी सजावट करण्यात आली होती. मातोश्रीबाहेर छोटेखानी मंच उभारण्यात आला होता. तिथेच उभे राहून उद्धव शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा