धोकादायक इमारत खचून १४ जखमी
मुंबई, दि.२९ : धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची समस्या मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत आहे. पावसाळ्यापूर्वी या इमारतींना नोटीस काढण्यात येतात. पण, त्यानंतर जीव मुठीत धरुन नागरिकांनी वास्तव्य करण्याचा निर्णय १९ जणांच्या जीवावर बेतला आहे.
कुर्ला पूर्वेतील शिवसृष्टी मार्गावर असलेल्या आणि धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या तीन मजली नाईक नगर गृहनिर्माण संस्था इमारतीचा एक भाग सोमवारी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास खचला. या दुर्घटनेमध्ये १९ जणांचा मृत्यू तर १४ जखमी झाल्याचे जखमींपैकी दहा जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

0 टिप्पण्या