स्वच्छ आणि आरोग्यदायी किनाऱ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने युनायटेड वे मुंबई या सामाजिक संस्थेतर्फे गुरुवारी माहीम समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत गुरू नानक खालसा कॉलेज मधील २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. १५०० किलोपेक्षा जास्त कचरा यावेळी गोळा करण्यात आला. यात बहुतांश प्लास्टिक तसेच कापडाचा समावेश आहे.
0 टिप्पण्या