Ticker

6/recent/ticker-posts

किनाऱ्यांवर प्रवेशबंदी

चौपाट्या, प्रेक्षणीय स्थळे, मैदानावर १५ जानेवारीपर्यंत निर्बंध

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत आणि मुंबईतील प्रेक्षणीय स्थळावर होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने मुंबई पोलीस आणि प्रेक्षणीय स्थळे, उद्याने आणि समुद्रकिनारी तसेच गर्दीच्या इतर सार्वजनिक ठिकाणी सायंकाळी ५ नंतर प्रवेश बंद केली आहे.

३० डिसेंबर पासून १५ जानेवारी २०२२ पर्यंत ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना तसेच मुंबईत येणार्‍या पर्यटकांना सायंकाळनंतर समुद्रकिनारी फेरफटका मारता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या