एटीएम फोडलेल्या आरोपीस अटक - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

एटीएम फोडलेल्या आरोपीस अटक

निर्मल नगर पोलिसांची धाडसी कारवाई

मुंबई, दादासाहेब येंधे : दिनांक १४जानेवारी २०२२ रोजी आरोपी अदनान शाहिद हुसेन शेख याने दिनेश भिकाजी गावकर हे तक्रारदार  काम करत असलेल्या एटीएम सिक्यूरिटी कंपनीच्या सुरक्षेत असलेल्या ॲक्सिस बँक ए.टी.एम. मशीन क्र. एसपीसीएन२३००४ या एटीएम  मशीन असलेल्या रूम मध्ये प्रवेश करून एटीएम मशीन मधून पैसे चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीनच्या लॉकर पॅनलचे दार तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून तक्रारदार यांनी निर्मल नगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केल्याने निर्मल नगर पो. ठाणे, गु. रजिस्टर क्र.  १६/२०२२ कलम ३८०, ५११भा. द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.



 नमूद गुन्ह्याचा तपास स.पो. नि.चेवले व पो.उप. नि.चौधरी व गुन्हे प्रकटीकरण पथक तपास करीत असताना घटनास्थळी  सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक इसम टोपिवर इंग्रजी अक्षरात किंग नाव असलेली काळ्या रंगाची टोपी व चेहऱ्यावर काळ्या रंगाचा मास्क लाऊन, काळ्या रंगाचे टी शर्ट व पँन्ट त्याचेवर पिवळ्या रंगाचे चित्त्याचे चित्र असलेले त्याच्या खाली इंग्रजी अक्षरात WILDLIFE असे लिहलेले कपडे, हातात कडे व घड्याळ परिधान केलेला दिसून आला. त्या अनुषंगाने पोलीसांनी पोलीस ठाणे  हद्दीतील अभिलेखावरील तसेच एटीएम तोडणारे अभिलेखावरील आरोपी तपासले. परंतु, नमूद आरोपी चेहरा झाकलेला असल्याने त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून वरून व शरीरयष्टी वरून तशा प्रकारचे ०८ ते ०९ संशयित इसम तपासले सदरचा इसम हा  बांद्रा रेल्वे स्टेशन पुर्व येथून निर्मल नगर पोलीस ठाणे हद्दीत येताना दिसला म्हणून  चर्चगेट रेल्वे स्टेशन ते विरार रेल्वे स्टेशन पर्यंत सर्व रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले व पोलिस ठाणे हद्दीतील २५ ते ३० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यादरम्यान खेरवाडी रोड येथे एका कॅमेरात नमूद वर्णनाचा इसम बेहराम नगर बांद्रा पुर्व परिसरात जाताना दिसला. सदर परिसरात येण्या जाण्याच्या मार्गावर दोन दिवस गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावला. नमूद वर्णनाचा इसम  गरिब नगर पाईप लाईन बांद्रा पुर्व येथे दिसून आल्याने आरोपीस (अदनान शाहिद हुसेन शेख वय-२१) सलग दोन दिवस  ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून त्यास १९ जानेवारी २०२२ रोजी अथक प्रयत्नांअंती पकडण्यात आले.


तपासी अधिकारी स.पो.नि. चेवले, पो.उप.नि.चौधरी, स.फौ. मेस्री, पो.ना. प्रभू,पो.ना. बर्गे, पो.ना.पवार, पो.ना.सोनवणे, पो. शि.कोयंडे, पो.शि.नाईक, पो. शि.वाघ यांनी गुन्हेगाराला योग्य चौकशी करून अटक केली. अशी माहिती निर्मल नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे यांनी दिली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज