मुंबई : देशभरात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका ओमीक्रॉनच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईतील पहिले पुर्णतः ऑक्सिजन खाटांनी सज्ज असे जम्बो कोविड सेंटर लवकरच मुंबई पालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या सुमारे १८ हजार स्क्वेअर मीटर जागेत म्हाडाच्या वतीने जम्बो कॉल सेंटर उभारण्यात आले आहे. येथे सर्वच्या सर्व १,२०० खाटांना ऑक्सिजन पुरवठयाची सुविधा असून याठिकाणी अतिदक्षता विभाग आणि लहान मुलांसाठी विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या