आईनेच केली स्वतःच्या मुलीची हत्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

आईनेच केली स्वतःच्या मुलीची हत्या

गुन्हे प्रकटीकरण शाखा ३-च्या पोलिस पथकाची कौशल्यपूर्ण कौतुकास्पद कामगिरी

पोलिसांनी खाक्या  दाखविताच सत्य समोर

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील आईनेच स्वतःच्या पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दुसरी मुलगी नको होती म्हणून तिने घरातल्या पाण्याच्या टाकीत स्वतःच्या मुलीला टाकल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आला आहे. 


३० नोव्हेंबर रोजी आपल्या तीन महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याची घटना सपना मगदूम यांनी काळाचौकी पोलिसांना  दिली होती. आपल्याला घरात बेशुद्ध करून चिमुकलीला पळून नेल्याची तक्रार तिने पोलिसांत केली होती.


सपना मगदुम हिनं तक्रारीत अपहरणाची सांगितलेली स्टोरी ऐकून पोलिसांनी त्या महिलेचं स्केचही तयार केलं होतं. ती मोबाईल घेऊन भांडी देणारी महिला २९ नोव्हेंबरला त्या भागात फिरताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत होती, आणि ती सपना मगदूम यांच्या घरीदेखील गेली होती. पण, ज्या दिवशी (३० नोव्हेंबर) ती येऊन गेल्याचा आणि मुलीला पळवून नेल्याचा दावा सपना मगदूम करत होती, त्यादिवशी तशी महिला फिरकलीच नसल्याचं पोलीसांच्या तपासात उघड झालं.


स्केचच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलेला ताब्यातही घेतलं; पण तिच्या चौकशीत पोलिसांना काही हाती लागले नाही आणि त्या महिलेने मुलीचे अपहरण केलं नसल्याची पोलिसांची खात्री पटली. मग पोलिसांनी तक्रारदार सपना हिच्याकडे आपला मोर्चा वळविला आणि तिची कसून चौकशी सुरू केली.


सपना मगदुम हिनं दिलेल्या माहितीत पोलिसांना तफावत आढळली आणि बिंग फुटलं... तक्रारदार सपना हिच्यावरच पोलिसांना संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच सपना हिने आपणच मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं आहे.


सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. सह पोलीस आयुक्‍त (गुन्हे) श्री. मिलींद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्‍त (गुन्हे) श्री.एस.वीरेश प्रभु, मा. पोलीस उप आयुक्‍त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, सहा. पोलीस आयुक्त, प्रकटीकरण-मध्य, श्री. नितीन अलकनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गु.प्र.शा.,कक्ष-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान काकड यांचे देखरेखीखाली सपोनि प्रकाश लिंगे, पोउनि सिध्देश जोष्टे, पो.ना. भास्कर गायकवाड, पो.ना. वैभव गिरकर, पो.ना. देवार्ड, पो.शि. पानखेडे, मपोना मंजली फडतरे यांनी केली आहे.


























प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज