Ticker

6/recent/ticker-posts

राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरू होणार

मुंबई : कोरोनाचा जोर धरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने दोन दिवसांपूर्वी सर्व कंदील दाखवला होता. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. काल गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.


कोविड-19 च्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते. त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्या. यापूर्वी ग्रामीण भागात पाचवीपासून तर शहरी भागात आठवी पासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 


आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या उपसेत पीडियाट्रिक टास्कफोर्स सोबत चर्चा केल्यानंतर येत्या १ डिसेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य विचारात घेऊन सुरक्षितपणे शाळा सुरु करण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. 


टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यातील हा तिसरा टप्पा आहे. या कालावधीत सुरक्षित वातावरणात शिक्षण सुरू राहण्यासाठी यापुढेही कोविड-19 संदर्भातील दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थी पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येतील त्यांचे आणि इतर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे ही आपली प्राथमिकता असेल असे त्या म्हणाल्या. 


याबाबत सातत्याने मार्गदर्शन सूचनाही जारी करण्यात येणार असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या