मुंबई : मुंबई शहरावर अतिरेक्यांनी केलेल्या २६/११ च्या भ्याड हल्ल्यात निष्पाप जनता व पोलीस दलातील लढवय्ये जवान शहिद झाले. त्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८.४५ वा. गिरगांव चौपाटी येथील शहिद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. तसेच सकाळी ९ वा. पोलीस मुख्यालय यांचे कार्यालय, एल. टी. मार्ग, क्रॉफर्ड मार्केट जवळ येथे शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.
तदनंतर मुंबई कॉंग्रेसतर्फे २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान सरनामा वाचन कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता मुंबई काँग्रेस कार्यालय, राजीव गांधी भवन, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई - ४०० ००१ येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रेस नोट
0 टिप्पण्या