Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक पोलिसाची गरज

येथे रोज उलट दिशेने होतोय प्रवास, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

मुंबई, दादासाहेब येंधे : सध्या आपल्याकडे राँग साइडचा अर्थ आपापल्या परीने लावला जातो. चिंचपोकळी पूर्वेकडील नप्पू हायस्कुल येथे शाळेत जाण्यासाठी बरेच पालक आपल्या मुलांना सकाळी शाळेत बाइकवरून डबल, ट्रिपल सीट घेऊन जातात. स्वत:बरोबर ते मुलांचाही जीव धोक्यात घालतात. 'यू टर्न' घेण्यापेक्षा अनेकांना छोटासा राँग साइड टर्न घेणे नेहमीच सोयीचे वाटते. कारण त्यांच्यासाठी ती राँग साइड नाही, तर हलकासा टर्न असतो. राँग साइडने वाहन चालवून लवकरात लवकर निघण्याच्या प्रयत्नातील अनेकांना अपघातास सामोरे जावे लागू शकते. 


येथील तरुण वर्ग सकाळ-संध्याकाळ उलट दिशेनेच प्रवास करत असतात. नुकताच श्रीकृपा हौ. सोसाटीतील दिलीप गोहिल यांना उलट दिशेने आलेल्या बाईकस्वराने अभ्युदय बँकेच्या समोर उडविले असून त्यांच्या पायाला जबरदस्त मार लागला आहे. येथे वाहतूक पोलीस नसल्याने वाहतुकीचे नियम सर्रासपणे पायदळी तुडविले जाताना कोणतीही अपघातजन्य परिस्थिती ओढावू नये, म्हणून अभ्युदय बँकेच्या समोर कायमस्वरूपी एक पोलीस नेमावा.

श्री . गोहिल यांचा अपघात व्हिडिओ पहा.... 👇





ता. क. : वाहतूक पोलिसांनी कायमस्वरूपी येथे पोलीस नेमावा. वरील व्हिडिओ पाहून येथील नागरिकांनी, पादचाऱ्यांनी सावध राहून रस्ता ओलांडावा. 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या