व्हिडिओ : मुंबईत बोरीवलीत महिलेवर बिबटयाचा हल्ला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

व्हिडिओ : मुंबईत बोरीवलीत महिलेवर बिबटयाचा हल्ला

दैव  बलवत्तर म्हणून ती बचावली

मुंबई, दादासाहेब येंधे  : मुंबईतील आरे कॉलनीतील परिसरात बुधवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास एका ५५ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही रेकॉर्ड झाला आहे. ५५ वर्षीय निर्मला देवी सिंह अशी पीडित महिलेची ओळख पटली असून, त्या घराबाहेर बसल्या असताना मागून बिबटया आला. तिथं बिबट्या आल्याची चाहूलही त्यांना लागली नाही. पण, व्हिडिओमध्ये त्याच्या डोळ्यांची चमक स्पष्ट दिसत आहे. 

अगदी दबक्या पावलांनी बिबट्या आला आणि मागूनच त्याने या महिलेवर हल्ला केला. तोही असा कि, हि महिला त्याच्या एका झेपेतच खाली कोसळली. पण, त्यानंतर स्वतःला सावरत या महिलेने जवळच असलेल्या काठीची मदत घेत बिबट्याला घाबरवत त्याला पळवून लावण्यात ती यशस्वी ठरली. यामध्ये तिला दुखापत झाली असून जोगेश्वरीतील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारांसाठी तिला दाखल करण्यात आले आहे. 

           व्हिडिओ 👇पहा...






















Video : पोलिसांकडून प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज