दररोज हजारो लोक हृदय विकाराने त्रस्त होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयरोगाविषयी जनजागृती करणे तसेच निरोगी हृदयासाठी काय काय काळजी घ्यावी याबाबत जनजागृती व्हावी यासाठी जागतिक २९ सप्टेंबर रोजी हृदय दिन साजरा केला जातो.
डॉक्टर कोविड काळात देखील जीवाची पर्वा न करता तेवढ्याच तत्परतेने आरोग्य सेवा पुरवित आहेत. हे काम करताना त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने काल जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून के.ई. एम रुग्णालयातील हृदय रोग तज्ञ डॉक्टरांच्या टीम ची जीवन प्रभोधिनी ट्रस्टच्या पदाधिकारयानी भेट घेतली व त्यांना जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या टीम मध्ये प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ.उदय जाधव, प्राध्यापक डॉ.द्वारकानाथ कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक डॉ.बालाजी ऐरोणी, डॉ.सुश्रुत पोटवार, डॉ. अभिषेक जोशी, डॉ.चरण लांजेवार सर (प्रोफेसर व युनिट हेड ) के.ई. एम.हॉस्पिटल, मुंबई कार्डीओलॉजी, डॉ.स्वप्नील संभापुरे - एस.एस.एम.डी. डिपार्टमेंट ऑफ कार्डीओलॉजी आदींचा समावेश होता. या डॉक्टर टीमला सुप्रसिद्ध लेखक प्रशांत डिंगणकर लिखित पुस्तक भेट स्वरूपात दिले. यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक श्री.सत्यवान नर, अध्यक्ष- अमित पवार, खजीनदार - हेमंत मकवाना, पदाधिकारी- साहेबराव शिंदे, गणेश शिरसागर, प्रमोद पवार आदी उपस्थित होते.
प्रेस नोट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा