Ticker

6/recent/ticker-posts

कार्ड क्लोनिंग करून लुबाणाऱ्यास बेड्या

 कार्ड क्लोनिंग करून लुबाणाऱ्यास बेड्या

ओशिवरा पोलीस ठाणेची जबरदस्त कारवाई

मुंबई, दादासाहेब येंधे : तक्रारदार यांनी जून २०२१ मध्ये घरात असतानाच त्यांच्या एटीएम कार्डमधून कोणीतरी अज्ञात इसमाने साठ हजार रुपये रक्कम एटीएमद्वारे काढली. त्याबाबत ओशिवरा पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक ५३३/२१, कलम ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ भादवि सह कलम ६६(क), ६६(ड) आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय बेंडाळे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रघुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक तुषार सावंत, पोहक्र ३२१९६/साटम, पोहक्र ३२२३४/बागवे, पोनाक्र ०४.०९३३/माने, पोशिक्र ०७.३४०/बारसिंग, पोशिक्र ०८.०८६३/सोयंके, पोशिक्र ०९.३५२/शेख, पोशिक्र ०९.३५८२/सपकाळ हे दिनांक १९/७/२०२१ रोजी रात्रपाळी दरम्यान पोलिस ठाणे हद्दीत लोखंडवाला परिसरात गस्त करीत असताना ते एक परदेशी नागरिक बँकेच्या एटीएम मध्ये संशयास्पदरित्या वावरताना मिळाला. त्याकरीता त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत ०९ एटीएम कार्ड मिळवून आली. सदरबाबत त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरची एटीएम कार्ड त्याची नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याची दाट शक्यता असल्याने त्याची घरझडती घेतली असता त्याच्या घरझडतीत एकूण कीं रु. २,०९,३२०/-ची कार्ड क्लोनिंग करता लागणारी साहित्य तसेच एकूण १५७ एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आली. अटक आरोपीकडून प्राप्त १६६ एटीएम कार्डची तपासणी केली असता त्यामधील ७२ एटीएम कार्डमध्ये विविध बँकेच्या एटीएम कार्ड क्लोनिंग केल्याचे निष्पन्न झाले. तरी सदर बाबत अधिक तपास करीत असून पुढील योग्य तपास सुरू आहे.

अटक आरोपी नेडेलकू व्हॅलेंटाईन एवोनट, (रोमन सिटीझन) वय ३८ वर्षे, राठी रूम नंबर ५०२, बिल्डींग नंबर ४/बी, साकी हेरिटेज को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, साकीविहार कॉम्प्लेक्स, साकीनाका, मुंबई येथून अटक केली असून त्याकडून ३ लॅपटॉप, १६६ एटीएम कार्ड, कार्ड स्वापिंग रीडर डिव्हाईस, २ नोट काउंटिंग मशीन, ४ मोबाईल फोन, ०८ यूएसबी कानेक्टड हिडन कॅमेरा, मेमरी कार्ड्स आणि कार्ड क्लोनिंगकरीता लागणारी साधनसामुग्री अशी एकूण - ₹ ०२,०९,३२०/- मालमत्ता जप्त केली आहे.

सदर आरोपीवर दहिसर पोलीस ठाणे, डी एन नगर पोलीस ठाणे, डोंबिवली पोलीस ठाणे, विनोबा भावे नगर पोलीस ठाणे, एम आर ए पोलीस ठाणे, बांद्रा पोलीस ठाणे, नवघर मुलुंड पोलीस ठाणे आदी पोलीस ठाणेत गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती ओशिवरा पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बेंडाळे यांनी दिली आहे.

















प्रेस नोट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या