Ticker

6/recent/ticker-posts

१२ आमदार निलंबित

 ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदारांचा विधानसभेत गोंधळ; परिषद तहकूब

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार गोंधळ घालत, सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या १३ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा ठराव सभागृहात मंजूर करण्यात आला. तर दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर विधान परिषदेच्या सभागृहात विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. या प्रश्नावर स्थगन प्रस्तावाची मागणी सभापती राम राजे निंबाळकर यांनी फेटाळून लावल्यामुळे दिवसभरात आरक्षणासाठी सहा वेळा; तर सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यामुळे आणखी दोनदा कामकाज तहकूब करावे लागले. दरम्यान या सर्व गोंधळानंतर निलंबित आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची राज्य भवनात भेट घे त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या