चौघांचा मृत्यू, सात जखमी
मुंबई : गोवंडी येथे काल शुक्रवारी पहाटे ४. ३० वाजण्याच्या सुमारास एक इमारतवजा घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन, राजावाडी या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेमुळे मुंबईतील अवैध बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गोवंडीतील शिवाजीनगर येथील प्लॉट क्र. ३ येथे उभारण्यात आलेले तीन मजली घर अचानक कोसळले. काल शुक्रवारी पहाटे सगळे झोपेत असताना घराचा सगळा सांगाडा कोसळला. प्रचंड आवाज झाल्याने आजुबाजूच्यांनी तेथे धाव घेत बचावकार्य सुरु केले. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ तेथे पोहोचले. ढिगाऱ्याखालून ११ जणांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले.

0 टिप्पण्या