मुंबई, दि. 7 : सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नुतन इमारतीचा प्रस्ताव प्राधान्यक्रम ठरवून मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी येत्या 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिलेत.
श्री. देसाई
यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीस पोलीस महासंचालक संजय
पांण्डेय, पोलीस महासंचालक (गृहनिर्माण) विवेक फणसळकर, गृह
विभागाचे प्रधान सचिव संजय सक्सेना, अतिरिक्त पोलीस
महासंचालक एस जगन्नाथन, वित्त विभागाचे सह सचिव विवेक दहीफळे,
साताराचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
गृह
राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयाची इमारत ब्रिटिश
कालीन असून येथे पावसाळ्यात पाणी साचते आणि गळती होत असल्यामुळे या कार्यालयासाठी
नवीन इमारत होणे गरजेचे आहे. या नवीन इमारतीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही.
आवश्कता भासल्यास पुरवणी मागण्यामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पोलीस
प्रशासनाने याबाबत प्राधान्यक्रम ठरवून
नुतन इमारतीचा प्रस्ताव मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेसाठी येत्या 15
दिवसात सादर करावा तसेच सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि शहर पोलीस
ठाण्याच्या इमारतीसाठीचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश गृह
राज्यमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिलेत.

0 टिप्पण्या