सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई, दादासाहेब येंधे : २६ जून २०२१ रोजी तक्रारदार शश्रीधरण रामकृष्ण नायर, वय ३३ वर्ष, राहणार ठी. बिल्डींग नंबर ३ च्या जवळ, खेरनगर, बांद्रा पूर्व, मुंबई हे त्यांच्या मालकीची इको गाडी त्यांच्या दुकानासमोर नेहमी पार्क करत असतात. दिनांक २६/०६/ २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या दरम्यान नमूद गाडी पार्क केलेल्या ठिकाणाहून बाहेर जाण्यासाठी निघाले असता गाडीचा खूप मोठा आवाज येऊ लागल्याने त्यांनी गाडीतून खाली उतरून गाडीची खाली पाहणी केली असता गाडीचा सायलेन्सर दिसून आला नाही म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा च्या मदतीने शोध घेतला असता पहाटे चार वाजेच्या दरम्यान कोणीतरी अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या ईको गाडी चा सायलेन्सर चोरी करून घेऊन जाताना दिसला म्हणून फिर्यादी शश्रीधरण रामकृष्ण नायर यांनी निर्मल नगर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली.
सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक चौधरी व गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताबडतोब तपास चालू करून घटनास्थळावरून सी सी टी वि फुटेज ची पाहणी केली असता एक अनोळखी इसम पहाटे ४ वाजेच्या दरम्यान सदर गाडीचा सायलेन्सर खोलून चोरी केल्याचे दिसून आले, सदर इसमाने मास्क घातलेला असल्याने त्याला ओळखण्यात अडचण येत होती, त्याचवेळी तो इसम सायलेन्सर खोलत असताना एक टॅक्सी त्याच्या समोरून दोन ते तीन वेळा फिरत असताना दिसून आली व सायलेन्सर खोलून घेऊन जाताना त्याच टॅक्सीतून गेल्याचे दिसून आले.
त्यावरून चोरी करण्यामध्ये तो टॅक्सी चालक ही त्यास सामील आहे याची खात्री झाली.
सदर टॅक्सीचा सीसीटीव्ही कॅमेरातून तपास काढला असता सदर टॅक्सी ही खेरवाडी जंक्शन कलानागर, धारावी टी जनक्शन, सायन हॉस्पिटल, दादर, खंडापारशी, नागपाडा जनक्शन, बी आय टी चाळ, अशी दक्षिण मुंबईत गेलेली दिसली, रात्रीची वेळ असल्याने सदर टैक्सीचा नंबर मिळू शकला नाही. परंतु, सदर टॅक्सी च्या सी सी टी वी च्या आधारे शोध घेणे चालू असताना जे जे हॉस्पिटलच्या भिंतीलगत पार्क केलेली सदर टॉक्सिच्या मिळत्या जुळत्या वर्णनाची टॅक्सी मिळून आली, सदर टॅक्सीवर जवळपास ७ तास पाळत ठेवली असता सकाळी ८ चे दरम्यान एक इसम सदर टॅक्सी जवळ येऊन त्या टॅक्सी मध्ये बसला. तो घटनास्थळावरील सीसीटीवी शी साधर्म्य असलेला होता. त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र सुफियां यांच्या मदतीने सदर युको गाडीचे सायलेन्सर काढल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली. त्याचेवर राबोडी पो ठाणे गु रजिस्टर क्र.१) ४७६/२०२० कलम ४५४, ४५७, ३८० भा द वि., २) राबोडी पो ठाणे. ४८३/२०२० कलम ३७९, ३४ भादवी., 3) १७८८/२०१८ कलम ३९२, ७५ भा द वी.4) राबोडी पो ठाणे. ४११/२०२० कलम ३८०, ४२७, ५११ भा द वि. अन्वये गुन्हे दाखल आहेत.
आरोपी बिलाल मतलब आलम शेख वय 33 राहणार रूम नंबर १३, तळमजला, प्रिन्सेस बिल्डिंग, इ- आर रोड, नागपाडा, जेजे हॉस्पिटल समोर, तसेच दुसरा आरोपी मोहम्मद सुफियान मोहम्मद इस्माईल शेख वय ३६ वर्षे, धंदा- टॅक्सीचालक, राहणार रूम नंबर ३ बीएमसी बिल्डिंग, खांडिया ट्रीट कॅफे पॅरेडाइज् हॉटेल जवळ, नागपाडा, मुंबई यांचेवर निर्मल नगर पो. ठाणे, गु र क्र. ३७१/२०२१ कलम ३७९, ३४ ,भा द वि. अनव्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडून युको गाडीचा सायलेन्सर किंमत अंदाजे रुपये १५,०००/- जप्त करण्यात आला असून त्यांना ०४ जुलै २०२१ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास अधिकारी पो उप नि चौधरी. पोह शिंदे किंद्रे, ठाकूर, पोना सरडे, मांडेकर, शेख, सोनावणे यांनी केला आहे अशी माहिती निर्मल नगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भंडारे यांनी दिली आहे.


0 टिप्पण्या