मुंबई : ज्येष्ठ अभितेने दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. काळ सकाळी दिलीपकुमार यांचे निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी शोक भावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत हजर होते.

0 टिप्पण्या