Ticker

6/recent/ticker-posts

सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :  मुंबईच्या एका 14 सदस्यीय शिष्टमंडळाने  प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि 28 जून) भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून गावाचा विकास होण्यासाठी उपलब्ध निधी केवळ विकास व पायाभूत सुविधा यांवर खर्च करण्यात यावा, मुंबई येथे सरपंच भवनाची निर्मिती करण्यात यावी तसेच करोनामुळे निधन झालेल्या राज्यातील 35 पेक्षा अधिक सरपंचांच्या कुटुबिंयाना आर्थिक मदत देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

यावेळी सरपंच परिषद मुंबईचे विश्वस्त अविनाश आव्हाड, राजाराम पोतनिस, आनंद जाधव तसेच अश्विनीताई थोरात यांसह सहा महिला सरपंच देखिल उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या