Ticker

6/recent/ticker-posts

प्रवाशांच्या बॅगा उघडून आतील सोन्याचे दागीने व रोख रक्‍कम चोरी करणा - या चोराला गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी केले जेरबंद

लोहमार्ग पोलिसांची जबरदस्त कारवाई


रेल्वे मेल/एक्सप्रेस मधून प्रवास करणारे प्रवाशी यांच्या बॅगा उघडून आतील सोन्याचे दागीने व रोख रक्‍कम चोरी करणा - या चोराला गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी केले जेरबंद 


मुंबई, दादासाहेब येंधे : लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात रेल्वे मेल/ एक्सप्रेस मधून प्रवास करणारे प्रवाशी यांच्या बॅगा उघडून आतील सोन्याचे दागीने व रोख रुपये चोरीच्या गुन्हयात वाढ झालेली असल्याने नोंद असलेल्या गुन्हयांचा समांतर तपास गुन्हे शाखेने करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. पोलीस आयुक्त सो, लोहमार्ग मुंबई यांनी आदेश दिले होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४२२/२०२१, कलम ३७९, ३४ भा.द.वि. मधील फिर्यादी नामे सौ . एस. सुंदरी कोनार. वय ४२ वर्षे, हया दिनांक १२/०६/२०२० रोजी तिरुवेलवेली - दादर एक्सप्रेसने प्रवास करतेवेळेस बदलापूर ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान दोन अनोळखी इसमांनी संगनमत करुन त्यांना बॅग उतरविण्यास मदत करतो असे सांगून फिर्यादी यांचे सोन्याचे दागीने व रोख रुपये चोरुन नेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 

वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई करीत होते. त्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण चव्हाण यांनी गुन्हयाचा सखोल अभ्यास करुन प्राप्त सी.सी.टी.व्ही . फुटेज आणि विश्वसनिय
बातमीदार यांच्या मदतीने नमुद गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. तसचे नमुद आरोपीताची गुप्त बातमीदारामार्फत माहिती प्राप्त करून, आरोपी नामे जगदिशचंदर S/O. चरणदास, वय ४२ वर्षे, रा. टि. गाव जुहारी राघो, ता. नारनोद, जि. हिसार, राज्य हरियाणा यास अटक केले. प्राप्त पोलीस कोठडी मुदतीत आरोपीताकडे सखोल तपास करून नमुद आरोपीकडून त्याने त्याच्या साथीदारांच्या गदतीने चोरलेली खालील वर्णनाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.


१) कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४२२/२०२१ कलम ३७९, ३४ भा.द.वि. गुन्हयातील मालमत्ता :-


१) २,१५,000 / - रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या हिरेजडीत बांगडया वजन अंदाजे ४० ग्रॅम., २) ४०,000 / - रुपये किंमतीची एक गोल मणी डिझाईनची सोन्याची चेन वजन अंदाजे १० ग्रॅम.,  ३) ८,000 /- रुपये रोख ५०० रुपये दराच्या १६ भारतीय चलनी नोटा . एकुण किंमत : - २,६३,००० /- रु. त्यामध्ये सोन्याचे दागीन्यांचे वजन ५० ग्रॅम अंदाजे. त्याचप्रमाणे आरोपीचे राहते घरी हांसी, जि. हिसार, राज्य हरियाण येथे नमूद पथक जावून घरझडती घेता आरोपीच्या घरातून पालघर रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३१/२०२१ कलम ३७९ भा.द.वि. या गुन्हयातील खालील नमूद वर्णनाची मालमतता हस्तगत करण्यात आली आहे.


१) १,९२,८०० /-रु. एक सोन्याचे मंगळसुत्र ३२ इंच वजन ४० ग्रॅम अंदाजे.


२) २,४३,६४० /- रु. एक सोन्याचा नेकलेस ३२ इंच, वजन ५० ग्रॅम अंदाजे.


३) ६७,४८०/- रु. एक जोड कानातील कर्णफुले ९० ग्रॅम व एक जोड कानातील रिंग वजन ४ ग्रॅम. एकुण वजन ९४ ग्रॅम. अंदाजे.


४) १,५४,२४० /- रु. सोन्याच्या कडीकडी डिझाईनच्या ०४ चैन प्रत्येकी ८ ग्रॅम असे एकुण ३२ ग्रॅम, १२ इंच लांबीच्या.
अंदाजे.


५) ५७,८४० /- रु. सोन्याच्या ०३ लेडीज अंगठया प्रत्येकी ४ ग्रॅम एकुण वजन ९२ ग्रॅम


एकुण किंमत : - ७,१६,000/- रु. त्यामध्ये एकुण वजन १४८ ग्रॅम वजनावे सोन्याचे दागीने अंदाजे. एकंदरीत नमूद आरोपीकडून रेल्वे पोलीस आयुक्तलयातील ०२ गुन्हे उघडकीस आले असुन, दोन्ही गुन्हयातील मिळून रोख रक्‍कम ८,००० /- आणि एकुण वजन १९८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने (मुळ किंमत रू ९,७१,000 /-) असे एकण किंमत रूपये ९,७९,००० /- किंमतीची (अक्षरी रूपये - नउ लाख, एकोणऐशी हजार रूपये) मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.


तसेच नमुद गुन्हयातील उर्वरित आरोपी चा शोध घेणे सुरु आहे. सदरची कामगीरी श्री. कैसर खलीद, पोलीस आयुक्त , लोहमार्ग मुंबई, एम. एम. मकानदार, पोलीस उप आयुक्त, मध्य परिमंडळ, लोहमार्ग मुंबई व प्रदिप चव्हाण, पोलीस उप आयुक्त, पश्चिम परिमंडळ यांचे मार्गदर्शनाखाली श्री . गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई, यांच्या सुचनांनुसार गुन्हे शाखेचे सपोनि सचिन लोखंडे, सपोनि हेगराज साठे, पोउनि श्रीकृष्ण चव्हाण, पोउनि अशोक होळकर, पोलीस अंमलदार महेश सुर्वे, अशोक गोसावी, शौकत मुजावर, अतुल साळवी, रविंद्र दरेकर, श्रीमती स्मीता वसावे, अमित बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, लक्ष्मण वळकुंडे, सतीश धायगुडे, महेश काळे, अजित माने, मयुर भैये, सतिश फडके, प्रमोद दिघे, मयुर सांळुखे , सत्यजीत कांबळे, अक्षय चव्हाण, सुनिल मागाडे तसेच सपोनि चव्हाण, कल्याण रे.पो.ठाणे, पोउनि शिंदे, पालघर रे.पो. ठाणे यांनी केली आहे. 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या