३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या ऍस्टर मुथ्थुस्वामी (वय 38) या महिलेला वरळी युनिट अँटी नार्कोटिक्स सेलच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच अटक केली . तिच्याकडून पोलिसांनी ३४ लाख ५० हजार रुपयांचा ११५ ग्रॅम वजनाचा हेरॉईन चा साठा जप्त केला आहे. तिला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात ड्रग्स विक्री करणाऱ्या तस्करा विरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असताना सीएसएमटीजवळील सेंट जॉर्ज रोडवर काहीजण ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती. वरळी युनिटच्या अधिकार्यांना मिळाली, या माहितीनंतर प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या पथकाने तिथे साध्या वेशात गस्त ठेवली होती. सोमवारी दुपारी जीपीओ जवळ पोलिसांनी एक महिला संशयास्पद फिरत असताना दिसली. ती कोणाची तरी वाट पाहत होती. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता अंगझडती तो हेरॉईन मिळून आले.

0 टिप्पण्या